रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम हा अन्य अवयवांवरही होतो.
गेल्या काही काळात मधुमेही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम हा अन्य अवयवांवरही होतो. म्हणूनच, मधुमेह झाल्यानंतर अन्य कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात ते पाहुयात.
मधुमेह झाल्यानंतर अनेकांना डोळ्याविषयीच्या तक्रारी जाणवतात.याला रेटिनोपथी असं म्हणतात. यात अंधूक दिसणे ही समस्या खासकरुन जाणवते.
मधुमेहामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. अनेकदा काही रुग्णांमध्ये अल्झायमरची समस्या निर्माण होते.
मूत्रपिंडात साखरेचं प्रमाण वाढलं तर किडनीदेखील निकामी होऊ शकते.
त्वचेवर काळे डाग पडतात. याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हटलं जातं.