लाेखंडी असूनही गंजत नाही, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, भारतात खरंच असा एक खांब आहे.
भारतातील हा लाेखंडाचा खांब सुमारे १५०० वर्षे जुना आहे. पण, हा खांब आजही तसाच्या तसा आहे, गंजलेला नाही.
हा खांब दिल्लीच्या महराैली भागात कुतुब मिनार संकुलात आहे. त्याला दिल्ली आयर्न पिलर किंवा महराैली आयर्न पिलर असे म्हणतात.
या खांबाची उंची ७.२ मीटर असून वजन जवळपास ६ टन इतके आहे. हा प्रचंड आकाराचा खांब शुद्ध लाेखंडाचा आहे.
हा लाेखंडाचा खांब गुप्त सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य (इ.स. ४०० च्या सुमारास) यांच्या काळात उभारला गेला हाेता.
१५०० वर्षांपासून हा खांब पाऊस, उन्ह आणि प्रदूषण झेलत उभा आहे. पण, हा खांब कधीही गंजलेला नाही.
हा खांब शुद्ध लाेखंडाचा आहे. म्हणजेच या लाेखंडात फाॅस्फरसचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे यावर एक नैसर्गिक थर आहे.
या लाेखंडी खांबावर असलेल्या संरक्षक थरामुळे ऑक्सिजन आणि ओलावा आत शिरू शकत नाही. त्यामुळे या खांबाला गंज लागत नाही.
या नॅचरल थराला पॅसिव्ह प्राेटेक्शन लेयर म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही इतक्या शुद्धतेचा लाेखंडाचा खांब बनवणं कठीण आहे.
दिल्ली येथील खांब जगभरातील धातुकर्म शास्त्रज्ञांसाठी अजूनही अभ्यासाचा विषय आहे.