रात्री मोबाईल जवळ ठेऊन झोपण्याचे काही दुष्परिणाम आहेत.कोणते ते पाहुयात.
सध्याच्या काळात मोबाईलमध्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच झाला आहे.
व्यक्ती कुठेही गेला तरी त्याच्या हातातला मोबाईल काही सुटत नाही. यात अनेक जण तर रात्री झोपतांनाही मोबाईल उशापाशी घेऊन झोपतात.
मोबाईलमधून ब्ल्यू लाइटस येतात. ज्यामुळे आपल्या मेलाटोनिन हार्मोन्सवर त्याचा विपरित परिणाम होतो. परिणामी, आपल्या झोपेत व्यत्यय येतो.
मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
अनेकदा मोबाईलमधून निघणाऱ्या ब्ल्यू रेडिएशनमुळे कानासंदर्भात समस्या उद्भवू शकतात. यात कानात जळजळ होणे किंवा कानदुखीची समस्या निर्माण होते.
मोबाईलवर येणाऱ्या सततच्या नोटिफिकेशनमुळे डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, डोळे सुजणे यांसारख्या समस्या होतात.