जगात असं जंगल आहे जिथली झाडं नाचत आहे, हलत आहेत, असं दिसत. हे वाचून विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे.
या जंगलातली झाड नेहमीच्या झांडाप्रमाणे सरळ वाढत नाहीत. ही झाडं वाढताना वाकडी तिकडी वाढतात.
हे अनोखं जंगल रशियातील ‘कुरोनियन स्पिट’ (Curonian Spit) नावाच्या बेटावर आहे.
इथल्या झाडांच्या फांद्या व खोडं विचित्र वळणं घेत वाढली आहेत. जणू ती नाचतायत, वाकतायत, गोल फिरतायत.
या जंगलात झाडं अशी का वाढली? यावर शास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, इथल्या कीटकांच्या हल्ल्यामुळे झाडांची वाढ विकृत झाली.
तर काही शास्त्रज्ञांच्या मते, जमिनीची हालचाल, वाळूची रचना आणि प्रचंड वारे यामुळे झाडं वेगवेगळी वळणं घेत वाढली.
इथल्या पाईन झाडांची खोडं स्पायरल, रिंग, S-शेप अशा विविध प्रकारात वळतात.
पर्यटकांसाठी हे जंगल एक मोठं आकर्षण आहे. लोक म्हणतात, इथली झाडं खरंच नाचतायत.
या जंगलाला कधी 'Drunken Forest' तर कधी 'Mystical Dancing Forest' असंही म्हणतात.