दररोज काजळ आणि आय लायनर लावल्यामुळे डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
प्रत्येक स्त्रिच्या मेकअप किटमधील महत्त्वाचं प्रोडक्ट म्हणजे आय लायनर आणि काजळ.
अनेक महिलांना मेकअप करायला आवडत नाही. परंतु, त्या काजळ आणि लायनर मात्र आवर्जुन दररोज लावतात.
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. आरुषी सुरी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दररोज काजळ, लायनर लावण्याचे साइड इफेक्ट्स कोणते ते सांगितले आहेत.
रोज लायनर, काजळ वापरल्यामुळे डोळ्यात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यात डोळ्यांची जळजळ होणे, डोळे सूजने यांसारख्या समस्या निर्माण होतात.
सतत लायनर, काजळ लावल्यामुळे पापण्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पापण्या गळायला लागू शकतात.