रोज हळदीचं पाणी पिताय? पाहा त्याचे दुष्परिणाम

हळदीचं पाणी प्यायल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु...

आधुनिक जीवनशैली, बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सध्या अनेकजण आरोग्याविषयी सजग झाल्याचं दिसून येतं.

बरेच जण शरीर डिटॉक्स करण्यासाठी किंवा शरीर हेल्दी ठेवण्यासाठी विविध ड्रिंक्सचं सेवन करत असतात. यात काही जण हळदीचं पाणीदेखील पितात.

हळदीचं पाणी प्यायल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हे पाणी एक सुपरड्रिंक आहे. परंतु, जर हेच पाणी तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त प्यायलात तर त्याचं नुकसानदेखील तितकंच आहे.

हळदीमध्ये करक्युमिन असतं ज्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त ते शरीरात गेलं तर यकृताशी निगडीत समस्या होतात.

दररोज हळदीचं पाणी प्यायल्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, गॅस होणे, पोटात आग होणे या समस्या निर्माण होतात. 

हळदीमुळे शरीरातील आयर्न शोषलं जातं. ज्यामुळे अॅनिमियासारखी समस्या निर्माण होऊ शकते.

कच्च्या हळदीचं जास्त सेवन केल्यामुळे त्वचेशी निगडीत समस्या उद्भवतात. यात त्वेचवर लाल चट्टे उठणे, खाज येणे किंवा त्वचारोगदेखील होऊ शकतो.

लिंबूपाणी प्यायल्याने होतो किडनीवर गंभीर परिणाम?

Click Here