आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६
आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो.
कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल.
दिवसाची सुरवात अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल.
एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल.
आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील.
आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे.
कठोर परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील.
आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा.
आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी दिवसाच्या सुरुवातीचा वेळ अनुकूल आहे.
आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.