आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025
आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल.
सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल.
आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल.
आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल.
आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते.
आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील.
आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल.
आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात.
आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.