उत्तर प्रदेशातील फरूखाबाद, औरैया आणि कनौज मधील काही ठिकाणी कच्च्या तेलाचा साठा असल्याचं म्हटलं जातं आहे. या घटनेनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
शास्त्रज्ञ जमिनीखालील तेलाचा साठा कशाप्रकारे शोधत असतील हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. त्यामुळेच आपण रहात असलेल्या घरात किंवा भागात तेलाचे साठे असतील तर ते कसं कळेल हे जाणून घेऊयात.
जमिनीखालील तेलाचे साठे शोधण्याची प्रक्रिया प्रथम जमिनीवरुन केली जाते. भूवैज्ञानिक एखाद्या भागातील पठारांची रचना आणि मातीची संरचना यांचा अभ्यास करतात.
तेलाचे साठे शोधण्यासाठी भूकंपीय सर्व्हे केला जातो. यात जमिनीवर कंपन निर्माण केले जातात. कंपन जमिनीच्या खोलवर जातात. यात जियोफोन नामक सेंन्सरच्या मदतीने जमिनीच्या आतील कंपने रेकॉर्ड केले जातात.
या फोटोच्या माध्यमातून जमिनीखाली तेलाचा साठा आहे की नाही हे समजून येण्यास मदत मिळते. तसंच गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय सर्व्हेक्षणाच्या मदतीने देखील तेलाचे साठे शोधले जातात.
जर गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय सर्व्हेक्षणामध्ये तेलाचा साठा असल्याचं निश्चित झालं तर त्या ठिकाणी ड्रिलिंग केलं जातं. ड्रिलिंग करणं जोखमीचं आणि तितकंच खर्चिक काम आहे.
तेलाच्या साठ्याचे संकेत मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रुमेंट्स विहिरीत सोडतात. या इंस्ट्रुमेंटच्या माध्यमातून भूगर्भातील हालचाली, दबावाची स्थिती, तापमान आणि इंधनाची सिच्युएशनचा अंदाज घेता येतो.