रोनाल्डोची होणारी पत्नी जॉर्जिना करते काय, कमवते किती?
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिगेज यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिगेज यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. त्यामुळं अनेक वर्षापासून रोनाल्डोसोबत एकत्र राहणाऱ्या मॉडेल जॉर्जिनाबद्दल, तिच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
जॉर्जिया प्रसिद्ध फॅशन ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग करते. Gucci, Prada, Chanel, Guess इत्यादी कंपन्यांसोबत केल्या गेलेल्या अनेक जाहिरातींमधून तिला भरपूर धनप्राप्ती झाली आहे.
इन्स्टाग्राम वर जॉर्जिनाचे ६५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून, प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी ती किमान ८३ लाख रूपये चार्ज करते.
तिची Netflix वर सिरीज आहे. त्याच्या प्रत्येक सीझनचे तिला सुमारे १० मिलियन डॉलर मिळाले आहेत. आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले आहेत.
ती स्पेनमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत ‘इस्पार्या’ हे हेअर ट्रान्सप्लान्ट व केअर क्लिनिक चालते. या कंपनीतून तिला एक चांगला हिस्सा वार्षिक उत्पन्न मिळतो.
Alo Yoga, Genny, Laverne Perfumes यासारख्या जगभरातील मोठ्या ब्रँड्सची ती अॅम्बेसॅडर आहे, याद्वारे देखील तिची चांगली कमाई होते.
जॉर्जिनाने अनेक घरांत गुंतवणूक केली आहे, ज्यापैकी काहींमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोची देखील हिस्सेदारी आहे. ही आलिशान घरे स्पेन व इटलीमध्ये आहेत.
टिक-टॉक, यूट्यूब प्लॅटफॉर्मवरही सक्रिय असून डिजिटल ब्रॅण्डिंगमधून देखील तिला उत्पन्न मिळते.
२०२५ मध्ये जॉर्जिना रोड्रिग्जची एकूण संपत्ती सुमारे १० मिलियन डॉलर ते २० मिलियन डॉलर इतकी असल्याचे अंदाज आहेत.