क्रिकेटमध्ये विविध रेकॉर्ड्स होत असतात. आज पाहूया, कधीच रन आऊट न झालेले Top 5 कसोटीपटू
इंग्लंडचा माजी फलंदाज ग्रॅहम हिक याने ६५ कसोटी सामने खेळले. त्यात तो कधीही धावबाद झाला नाही
संयमी इंग्लिश कर्णधार पीटर मे आपल्या ६६ कसोटींच्या कारकिर्दीत कधीही रनआउट झाले नाहीत
पाकिस्तानी माजी फलंदाज मुदस्सर नझर एकूण ७६ कसोटी खेळले पण एकदाही धावचीत झाले नाही
इंग्लंडचा माजी कर्णधार व दमदार फलंदाज पॉल कॉलिंगवूड ८६ कसोटीत कधीही रन आऊट झाला नाही
भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देव १३१ कसोटी सामन्यात एकदाही धावबाद झाला नाही