कार्डवर मिळाले रिवॉर्ड पॉइंट्स, पण त्यांची नेमकी व्हॅल्यू किती?

‘स्वाइप करा आणि कमवा’ याचे आकर्षण क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या सर्वांनाच असते.

‘स्वाइप करा आणि कमवा’ याचे आकर्षण क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या सर्वांनाच असते. कॉफी असो किंवा वीकेंड ट्रिपला जायचं असो, प्रत्येकाला खर्चावर पॉइंट्स मिळवायचे असतात. 

पण या पॉईंटचा योग्य वापर कसा करायचा, यामागचे एक गणित असते. अनेक कंपन्या आकर्षक ऑफर देतात. पण हे पॉइंट्स रिडीम करण्याआधी त्यांची किंमत युजर्सनी समजून घेतलेली नसते. 

जास्त पॉइंट्स म्हणजे चांगलाच परतावा असे नाही. कारण बऱ्याच वेळा त्या पॉइंट्सची रिडीम व्हॅल्यू कमी असते. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्सची किंमत त्यांच्या कन्वर्जन रेटवर अवलंबून असते. 

जर एखादे कार्ड प्रत्येक १०० रुपयांवर ५ पॉइंट्स देत असेल, तर ते उत्तम वाटू शकते. जर प्रत्येक पॉइंटची किंमत फक्त ०.१० रुपये असेल, तर १०० रुपयांवर फक्त ०.५० रुपयांचाच फायदा होईल. 

दुसरे कार्ड जर १०० रुपयांवर २ पॉइंट्स देत असेल व प्रत्येक पॉइंटची किंमत ०.५० रुपये असेल, तर १ रुपयांचा फायदा होईल. म्हणजेच दुप्पट परतावा मिळेल.

तुम्ही किती पॉइंट्स कमावत आहात यापेक्षा त्यांची खरी व्हॅल्यू काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. रिवॉर्ड पॉइंट्सचे कन्वर्जन रेट्स त्यांचा भागीदार आणि दिलेल्या डील्सवर अवलंबून असतात. 

एअरलाइन्स आणि हॉटेल सहसा बल्क डील्समुळे चांगली किंमत देतात. तर गिफ्ट कार्ड्स किंवा मर्चेंडाइजसाठी रिडीम व्हॅल्यू सामान्यतः कमी असते.

Click Here