कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे मास्क
देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशातच मास्क लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मास्कला देखील एक्सपायरी डेट असते. ही डेट तीन ते पाच वर्षांपर्यंत असते.
मास्कच्या पाकिटावर एक्सपायरी डेट देण्यात आलेली असते.
एक्सपायरी डेटनंतर मास्कची फिल्टर क्षमता कमी होते.
कापडी मास्कला एक्सपायरी डेट नसते. तो धुवून पुन्हा वापरता येतो.
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा नक्की वापर करा. नवीन मास्क घेण्याआधी एक्सपायरी डेट चेक करून घ्या.