जोडप्यांनो, सिंगापूरमध्ये करा हनिमून प्लॅन!

नुकतंच लग्न झालंय आणि हनिमूनचा प्लॅन करत असाल, तर सिंगापूर बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

सिंगापूर, नवविवाहित जोडप्यांसाठी रोमँटिक अनुभवांनी भरलेले एक आधुनिक शहर आहे.

मरीना बे सँड्सः या प्रतिष्ठित हॉटेलमधील छतावरील तरंगत्या तलावातून शहराचे विहंगम दृश्य बघू शकता.

गार्डन्स बाय द बे: सुपरट्री ग्रोव्ह आणि फ्लॉवर डोममधून रोमँटिक फेरफटका मारण्याचा आनंद घेऊ शकता.

सेंटोसा बेटः रिसॉर्ट्स, थीम पार्क आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या बेटावर धमाल करू शकता.

चांगी पॉइंट कोस्टल वॉकः समुद्राच्या लाटांवर शांत आणि रोमँटिक वॉकसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

क्लार्क क्वे: रात्रीच्या वेळी येथील नाईटलाइफ आणि रंगीबेरंगी बाजारपेठांचा अनुभव नक्की घ्या.

ऑर्चर्ड रोडः या ठिकाणचे लक्झरी मॉल्स आणि बुटीक खरेदीची आवड असलेल्या जोडप्यांसाठी पर्वणी आहेत.

सिंगापूर बोटॅनिकल गार्डन्सः युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले हे ठिकाण अतिशय सुंदर आहे.

Click Here