स्वयंपाकघरात दाेघांनी मिळून स्वयंपाक केला, तर स्वयंपाकाची चव तर वाढतेच, पण दाेघांच्या नात्यातला गाेडवाही वाढताे.
स्वयंपाकघरात दाेघांनी मिळून कणिक भिजवणे, चिरणे, तळणे ही काम मिळून केल्यास दिवसभराचा ताण कमी हाेऊन मानसिक समाधान मिळत.
एकत्र स्वयंपाकघरात काम करताना राेजच्या गाेष्टी शेअर केल्या जातात. काेणताही स्क्रीनमध्ये नसताना संवाद साधला जाताे.
भाजी चिरून दिली की ती फाेडणीला घालते, यातून तुमच्यातलं नातं दृढ हाेत जातं. टीम वर्कमुळे एका काेणावर सगळा भार पडत नाही.
दाेघ मिळून स्वयंपाक करताना, अनेकदा गाेंधळही उडताे. मीठ जास्त, कमी, आमटी पातळ हाेते. पण, पुढे जाऊन याच तुमच्या नात्यातल्या आठवणी तयार हाेतात.
एकमेकांच्या सवयी, आवडी - निवडी लक्षात राहतात. त्या आवडी जपण्यासाठी पर्याय शाेधले जातात. एकत्र काम केल्याने त्या क्षणातला आनंद अनुभवता येताे.
काम वाटून घेतलं म्हणजे एकमेकांना समजून घेणं असतं. कधी जास्त तर कधी कमी जबाबदारी ओळखून घेतली दिली जाते.
स्वयंपाकाचं काम काेणा एकावर न पडल्याने त्याचे ओझे वाटतं नाही. आनंदाने स्वयंपाक झाल्यास नक्कीच त्याची गाेडी वाढते. नात्यातला गाेडवा टिकून राहताे.