देशातील सर्वात उंच धबधबा आपल्या साताऱ्यात; कसं जायचं?

सातारा जिल्ह्यातील भांबवली वजराई हा धबधबा देशातील सर्वाच उंच धबधबा आहे.

वजराई या धबधब्याची उंची १८४० फूट एवढी आहे. हा सरळ उभ्या दगडावरुन वाहतो. 

या धबधब्याच्या ठिकाणी उरमोडी नदीचे हे उगम स्थान आहे. 

भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे.

या धबधब्यापासून अवघ्या ५ किमी वर कास पुष्प पठार आहे. भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नाही.

भांबवली येथून आसपास एक किमी गेल्यानंतर धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत भरतं. धबधब्याचा आवाजही कानावर पडत राहतो.

सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत या धबधब्याला  भेट द्या. पण, मुसळधार पाऊस असेल तर जाणे टाळा.

सातारा येथून भांबवली - ३२ किमी दूर आहे. सातारा-कास -कासपासून तांबी (भांबवली) पर्यंत जावे लागते. किंवा महाबलेश्वर ते तापोळा ते बामणोली-कास, कास ते तांबी (भांबवली) असं जाता येतं.

Click Here