मुलांना जर खोकला झाला तर कोणते घरगुती उपाय करायचे ते पाहुयात.
वातावरण बदललं की लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा लगेच परिणाम होतो. यात सर्दी-खोकला तर आवर्जुन मुलांना होतो.
मुलांना खोकला झाल्यास त्यांना जमेल तितकं हायड्रेटेड ठेवायचा प्रयत्न करा. त्यासाठी त्यांना भरपूर पाणी, लिंबू सरबत, सूप प्यायला द्या.
घरातील वातावरण कोरडं ठेवायचा प्रयत्न करा. यासाठी घरात ओवा आणि कापूर यांची धुरी करु शकता. ज्यामुळे घरातील आर्द्रता कमी होईल.
मुलांना गरम पाण्याची वाफ द्या. ज्यामुळे त्यांचा कफ मोकळा होईल.
मुलांचा घसा खवखवत असेल तर त्यांना कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला द्या. (हा उपाय ५ वर्षावरील मुलांसाठी करता येईल.)
मुलांना आजारपणात शक्य होईल तितका आराम, झोप घेण्यास सांगा. ज्यामुळे त्यांना लवकर बरं वाटेल.