गरम गरम भुट्ट्याचे 'हे' आहेत फायदे!

जाेरदार पाऊस पडत असताना, थंड वातावरणात गरमा गरम भुट्टा म्हणजेच भाजलेलं कणिस खायला खूप मजा येते. 

पावसळ्यात मस्त भाजलेल्या कणसांवर लिंबू पिळून तिखट - मीठ लावून खात अनेकदा पाऊन एन्जाॅय केला असेल. 

पावसाळ्यात भाजलेलं कणिस खाऊन तुम्ही फक्त पाऊस एन्जाॅय करत नाही, तर शरीरालाही पाेषक मूल्य देता, हे तुम्हाला माहिती आहे का?

भाजलेलं कणिस आणि पावसाळा हे एक समीकरणच झालं आहे. पण, हे भाजलेलं कणिस खूप आरोग्यदायी आहे. त्याचे फायदे पाहू या.

मक्याच्या कणसात व्हिटॅमिन ए खूप प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए मुळे डाेळ्यांचे आराेग्य सुधारते. दृष्टी चांगली राहण्यास मदत हाेते. 

मक्याच्या कणसामध्ये व्हिटॅमिन बी ९ आढळते. हे गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी उपयुक्त असते. गर्भवती महिलांनाही याचा फायदा आहे. 

भाजलेल्या कणसामध्ये अँटी ऑक्सिड्न्टसे प्रमाण जास्त असते. यामुळे त्याचा आपल्या शरीराला फायदा हाेताे.

मक्यामध्ये मॅग्नेशियम, फाॅस्फाेरस आणि आर्यन अशी खनिजे माेठ्या प्रमाणात असतात. आराेग्य चांगले राहण्यासाठी ही खनिजे उपयुक्त असतात. 

Click Here