पुरी तळल्यानंतर ती तेलकट होऊ नये यासाठी काही टिप्स पाहुयात.
सणावाराच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरीचा बेत हा होतोच. मात्र, अनेकदा पुरी करतांना ती तेलकट होते. ज्यामुळे खातांना ताटाला आणि बोटांनाही सगळं तेल लागतं.
पुरी तळल्यानंतर ती तेलकट होऊ नये यासाठी काही टिप्स पाहुयात.
पुरी तळण्याआधी काही वेळ तिला फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये पुरी सेट झाल्यावर १५- २० मिनिटांनंतर मग पुरी तळायला घ्या.
पुऱ्यांसाठी कणिक भिजवल्यानंतर साधारणपणे अर्धा तास तिला रेस्ट द्या. त्यानंतरच पुरी तळायला घ्या.
पुरीसाठी कणिक मळताना जास्त सैल मळू नये. कणिक मळताना ती थोडी घट्ट मळावी.
पुरी लाटताना पीठ वापरू नये. त्याउलट थोडे तेल लावून पुरी लाटून घ्यावी. पीठ जास्त तेल शोषतात.
पुरीसाठी तेल तापवताना अगदी कडकडीत तेल गरम करा. थंड तेलात पुऱ्या तळल्यास त्या कडत होतात आणि तेल शोषतात.