रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय
सध्याच्या काळात अनेक जण लो किंवा हाय ब्लडप्रेशरच्या त्रासाने त्रस्त आहेत.
आज आपण असे काही उपाय पाहुयात. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
रोज सकाळी २ लसणाच्या पाकळ्या रिकाम्यापोटी खा. लसणामध्ये रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे गुणधर्म आहेत.
रात्री एक चमचा मेथीचे दाणे भिजत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी खा.
सकाळी ४-५ तुळशीची पान एक चमचा मधासोबत घ्या.
सकाळी कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून प्या. रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि, बीपी कंट्रोलमध्ये राहते.