सतत 'इअरफोन'चा वापर करताय?; मोठा आवाज देईल बहिरेपणा

वायरलेस इयरबड्स कानांत घालून दीर्घकाळ वापरणे हा आता एक नवीन ट्रेंड बनलाय 

पावसाळ्यात सतत इअरफोन, ब्लूटूथ इअरबड्स वापरल्याने कानांत ओलसरपणा राहून 'ऑटोमायकोसिस' हा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो

कानात सतत मोठ्या आवाजात ऐकणे कायम ठेवल्यास कानाच्या पडद्यांना इजा पोहोचून श्रवणशक्तीच्या गंभीर समस्या ते बहिरेपणादेखील उद्भवू शकतो

ब्लूटूथ वेअरेबल्स हा एक चांगला पर्याय आहे. मात्र त्यांचा जास्त वापर आणि निष्काळजीपणामुळे कानाला इजा होऊ शकते

बॅक्टेरिया आणि बुरशी इअरबड्समध्ये जमा होऊ शकतात ज्यामुळे कानापर्यंत पोहोचून इन्फेक्शन होऊ शकते. आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नसते

इअरबड्स दीर्घकाळ घातल्यामुळे इयरवॅक्स जमा होऊन ऐकण्याच्या समस्या आणि संसर्ग होऊ शकतो. ऐकण्याची तसेच मनाची एकाग्रतेची क्षमता कमी होऊ शकते

सतत वापरामुळे कानाच्या आतील भागात त्वचेवर जळजळ, अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे कानात खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येऊ शकते

तज्ज्ञांकडून सल्ला दिल्यानंतरही तरुणाई कायमच दुर्लक्ष करीत असल्याने कानाच्या समस्यांमध्ये भर पडते असं ईएनटी तज्ज्ञ डॉ. पुष्कर लेले सांगतात

Click Here