बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे पोट सहज साफ होत नाही.
सध्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे पोट सहज साफ होत नाही.
परंतु, आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास पोटाच्या अनेक विकारांपासून दूर राहाता येईल.
आपल्याला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दिवसभरात भरपूर पाणी प्या. किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे.
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवायचा असेल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी आहारात पपई आणि केळीसारखी फळे खाऊ शकता. यामध्ये भरपूर फायबर असते जे पोट स्वच्छ करण्यास मदत करते.
पोट साफ करण्यासाठी नियमितपणे त्रिफळा पावडरचे सेवन करा. कोमट पाण्यासोबत त्रिफळा घेतल्याने पोट साफ होईल.
नारळ पाणी आणि आवळ्याचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेची समस्या कमी करायची असेल तर व्यायाम करायला हवा. यामुळे शरीर तंदुरुस्त होते.
यासाठी आपण भुजंगासन करु शकतो. पोटाच्या संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्या कमी होईल.