नातं म्हटलं की, त्यात रूसवे - फुगवे हाेतच असतात. पण, काहीवेळा नात्यात काेणत्या ना काेणत्या कारणाने दुरावा येताे. हा दुरावा असा दूर करा.
काेणतही नातं जाेडणं, तसं साेप असतं. पण, ते नातं निभावण म्हणजे खरी परीक्षा असते. नातं निभावणं खूप महत्त्वाच असतं.
तुमच्या नात्यात आलेला दुरावा तुम्हाला कमी करायचा असेल. तर, तुम्ही हे उपाय नक्कीच करून फरक नक्की अनुभवू शकता.
नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी तुम्ही 'संवाद' साधला पाहिजे. संवादामुळे गैरसमज दूर हाेतात. आपुलकी निर्माण हाेते.
दाेन व्यक्तींच्या नात्यात कधीच तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका. दाेघांत तिसरी व्यक्ती आली की नातं बिघडू शकत.
पार्टनरला नेहमीच त्याच्या आयुष्यात त्याची स्पेस तुम्ही दिली पाहिजे. त्याचं संपूर्ण आयुष्य तुम्हीच व्यापून ठेवू नका.
दाेघांचही डाेकं शांत असेल, तेव्हाच तुम्ही काेणत्याही विषयावर चर्चा करा. डाेक्यात राग असताना चर्चा करणे टाळा.
तुम्ही जेव्हा बाेलाल, तेव्हा भूतकाळातल्या गाेष्टी मधे आणू नका. वर्तमान काळातील गोष्टींविषयी बाेला.