पाणी न उकळता चहा किती वेळात हाेताे तयार?

चहा करण्यासाठी उकळलेल्या गरम पाण्यात चहा पावडर टाकली, की पाण्याचा रंग पटकन बदलताे, पटकन चहा तयार हाेताे. 

पण, तीच चहा पावडर थंड पाण्यात टाकली, तर खूप वेळ झाला तरीही पाण्याचा रंग बदलत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का?

यामागे विज्ञान आहे. पाण्याचं तापमान बदललं की रेणूंची हालचाल ही बदलते. गरम पाण्यात रेणू फार वेगाने नाचतात. परिणामी पाण्याचा रंग बदलताे. 

या वेगामुळे चहातील टॅनिन्स, कॅफिन आणि फ्लेवर्स पटकन पाण्यात पसरतात. थंड पाण्यात मात्र ही प्रक्रिया मंद गतिने हाेत असते.

पाण्याचं तापमान जितकं जास्त diffusion तितकं जलद हाेते. म्हणून चहाचा रंग, सुगंध आणि चव पटकन पाण्यात  मिसळते.

थंड पाण्यातही चहा बनतो. त्याला cold brew tea म्हणतात. पण अशा प्रकारे चहा बनवण्यासाठी तब्बल ६ ते ८ तास लागतात. 

पाण्याचे तापमान जास्त नसल्यामुळे चहा पावडरमधील गुणधर्म पाण्यात उतरण्यासाठी हा वेळ लागताे आणि चहा तयार व्हायलाही इतका वेळ जाताे. 

यामुळे घरांमध्ये नेहमीच उकळत्या पाण्यात चहा केला जाताे. कारण, हा चहा पटकन आणि चविष्ट तयार हाेताे. 

गरम पाण्यात चहा केल्याचा अजून एक फायदा म्हणजे पाण्यातील जंतू मरून जातात. हे आराेग्यास उपयुक्त आहे. 

Click Here