आपण विश्रांती घेतो त्याप्रमाणे देवालाही विश्रांती दिली तर त्याचे होतात अनेक लाभ, त्याबरोबरीने झोपण्यापूर्वी कोणत्या ६ गोष्टी करायच्या ते जाणून घ्या.
दिवसभर आपण सगळे नियम काटेकोरपणे पाळतो, पण सुखाची झोप मिळाली नाही तर दिवसभराची मेहनत जाते वाया; त्यासाठी या ६ सवयी आजच लावा.
आयुष्यात दोन वेळचे पोटभर जेवण आणि ८ तासांची सुखाची झोप मिळणार नसेल तर सगळे कष्ट व्यर्थ आहेत, ते मिळावे यासाठी काही चांगल्या सवयी पाहू.
आपण सकाळी संध्याकाळी घरात केर काढतो, पण झोपण्यापूर्वी घराचा स्वच्छ केर काढून झोपा, घरात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
झोपण्यापूर्वी आपले देवघर शक्यतो झाकून ठेवा, त्यामुळे देवांनाही शांत निद्रा मिळेल आणि वास्तू शांत राहील.
झोपण्यापूर्वी घराच्या उत्तर दिशेला कचरा राहणार नाही याची काळजी घ्या, कारण ती लक्ष्मीच्या आगमनाही दिशा आहे.
घरातल्या समस्या दूर करायच्या असतील तर झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा.
झोपण्यापूर्वी आपल्या बिछान्यावरील चादर स्वच्छ झटकून घ्या आणि मग झोपा, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
झोपण्यापूर्वी ५ मिनिटं ध्यान करा, मनाला आणि वास्तूला शांती लाभेल.