झपाट्याने वजन कमी करते दालचिनी...!

फक्त सेवनाची योग्य पद्धत माहीत असायला हवी...!

दालचिनी ही एक अशी गोष्ट आहे, जी कुठल्याही भारतीय स्वयंपाकघरात सापडतेच सापडते.

दालचिनीचा वापर रोजच्या अन्नात तर केला जातोच. शिवाय तिचे पाणी त्वचा चमकदार बनवण्यासही मदत करते?

महत्वाचे म्हणजे, यामुळे वजनही झपाट्याने कमी होते.

संशोधनानुसार, दालचिनी रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टरॉल आणि रक्तदाबही कमी करण्यास प्रभावी आहे.

चमकदार त्वचेसाठी एक छोटी दालचिनीची काडी, केशर, 1-2 सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि 1.5 कप पाणी घ्या आणि सर्व सामग्री मंद आचेवर 10 मिनिटे उकळा.

थंड करून गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी एक कप प्या.

वजन कमी करण्यासाठी एक दालचिनीची काडी, अर्धा चमचा सुकलेल्या आल्याची पावडर, थोडे मीठ, चिमूटभर मिऱ्याची पावडर घ्या.

हे मसाले 2 कप पाणी अर्धे होईपर्यंत त्यात उकळा. थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस घाला.

हे पाणी दुपारी अथवा सायंकाळी हळूहळू प्या, यामुळे झपाट्याने वजन कमी होते.

तुम्हाला माहित्येय, रोज मनुके खाण्याचे फायदे...?जाणून लगेच खायला सुवात कराल...!

Click Here