ईशान्य भारतातून आलेल्या अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
ईशान्येकडील अनेक लोकांना त्यांच्या दिसण्यावरुन वेगवेगळी टोपण नावं पडतात
ते लोक काहीसे चीनी दिसत असल्याने त्यांना सर्रास चिडवलं जातं
बिग बॉस १८ फेम अभिनेत्री चुम दरांगलाही वंशवादाचा सामना करावा लागल्याचा तिने खुलासा केला
सुरुवातीला अनेकजण तिला 'मोमो', तर कोरोनानंतर 'कोरोना व्हायरस' अशी नावाने बोलवायचे.
काही वर्षांपूर्वी मुंबईतच एका मॉलमध्ये काही लोकांनी तिला 'मोमो' आणि 'चाऊ चाऊ' अशी हाक मारली होती.
'आम्ही वेगळे दिसत असू, पण आम्ही भारतीयच आहोत' हे लोकांनी स्वीकारावं अशीच माझी इच्छा आहे