त्यामुळेच हे दोन रंग इतके महत्त्वाचे का आहेत ते समजून घेऊयात.
डिसेंबर महिना आला की सगळ्यांना वेध लागतात ते क्रिसमस सेलिब्रेशनचे. २५ डिसेंबर रोजी जगभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
सध्या सगळीकडे क्रिसमसचा माहोल असून बाजारपेठाही सध्या रंगबिरंगी लाइट्स, क्रिसमस ट्री यांमुळे सजल्या आहेत.
क्रिसमसमध्ये लाल आणि हिरव्या या दोन रंगांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच हे दोन रंग इतके महत्त्वाचे का आहेत ते समजून घेऊयात.
क्रिसमस ट्रीला या दिवशी विशेष महत्त्व असून त्याचा हिरवा रंग हे सदाबहार असण्याचं प्रतिक आहे. पूर्वीच्या काळी कडाक्याच्या थंडीत झाडे कोमेजून जायचं. परंतु, अशी काही झाडे होती जी टवटवीत रहायचं.
कठीण प्रसंगातही कसं ठामपणे उभं रहायचं हे या झाडाने सगळ्यांना शिकवलं. त्यामुळे हे झाडं या दिवशी महत्त्वाचं असून त्याच्या हिरव्या रंगालाही तितकंच महत्त्वं आहे.
मध्य युगात युरोपमधील अनेक ठिकाणी क्रिसमसच्या काळात स्वर्ग, बायबल यांवर आधारित नाटकांचं आयोजन व्हायचं. या नाटकांमध्ये इडन गार्डनमध्ये स्वर्गातील झाड किंवा पाईन ट्रीवर लाल रंगाचे सफरचंद दाखवण्यात यायचे.
म्हणूनच, क्रिसमस ट्री वरदेखील सफरचंद, लहान बेरीज किंवा गिफ्ट्स अडकवले जातात.