डिसेंबर महिना आला की सगळ्यांना वेध लागतात ते क्रिसमस सेलिब्रेशनचे.
अनेकांच्या घरी क्रिसमस पार्टीचं आयोजन केलं जातं. परंतु, या पार्टीत मित्रपरिवार आणि कुटुंबियांना कोणतं गिफ्ट द्यावं हा प्रश्न अनेकांना कायम पडतो.
यंदाच्या क्रिसमस पार्टीमध्ये आपल्या कुटुंबियांना वा मित्रपरिवाराला कोणते गिफ्ट्स देता येतील याच्या काही आयडिया पाहुयात.
गिफ्ट सगळ्यांनाच आवडतात यात खासकरुन लहान मुलांमध्ये गिफ्टचं विशेष क्रेझ असतं. त्यामुळे त्यांच्या वयानुसार तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. यात खेळणी, गोष्टींची पुस्तक, ट्रेडिंग गेम्स तुम्ही देऊ शकता.
गिफ्ट म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला एखादा छानचा दागिना देऊ शकता. किंवा, तिच्या आवडीनुसार, साडी, ड्रेस किंवा हँडबॅगही देऊ शकता.
जर तुम्हाला तुमच्या पतीला गिफ्ट द्यायचं असेल तर घड्याळ, ब्रँडेड शूज, सनग्लासेस किंवा कार,बाईक अॅक्सेसरीज असं बरंच काही देऊ शकता.
जर तुम्हाला मित्रपरिवाराला काही गिफ्ट करायचं असेल तर कपडे, चॉकलेट्स किंवा फोटोफ्रेम असं काहीही देऊ शकता.
फॉर्च्यूनर कार बुलेटफ्रूफ करण्यासाठी किती खर्च येतो?