'हे' ५ स्ट्रीट फूड आहेत हेल्दी 

स्ट्रीट फूड वाईटच, असं कोणी म्हणत असेल तर त्यांना ठणकावून पुढील पदार्थांची यादी द्या आणि त्यांच्यासकट स्ट्रीट फूड एन्जॉय करा. 

स्ट्रीट फूड वाईट हेच आपण ऐकत आलो आहोत, पण तुम्ही खात असलेले ' हे ' ५ स्ट्रीट फुड्स आश्चर्यकारकरित्या आहेत अत्यंत आरोग्यदायी आहेत. 

आंबवलेल्या पिठापासून बनवलेल्या मऊ, लुसलुशीत इडली आणि खोबऱ्याची चटणी  हे पचनासाठी फायदेशीर तर आहेच पण अत्यंत पौष्टिक सुद्धा आहेत.

दही, चणे/वाटणे, स्प्राऊटने भरलेल्या या चटपटीत पुऱ्या टेस्टी तसेच पचनासाठी अतिशय हलक्या असतात.

पावसाळ्यात रस्त्याकडेला लिंबू व हलके मसाले लावून निखाऱ्यांवर भाजलेले हे कणीस फायबरयुक्त तसेच तेलाचा एक अंशही नसलेले सुपरफूड आहे.

मोड आलेले मूग, चणे, लिंबू आणि काही मसाले मिसळून बनवलेले हे चाट पचायला अत्यंत हलके असून, हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

पोहे, शेंगदाणे, कडीपत्ता आणि हळद हे सर्वच घटक हेल्दी फॅट्स आणि लोहयुक्त आहेत. त्यामुळे पचनासाठी हलका व सकाळच्या पोटभरीसाठी पोहे हा उत्तम नाश्ता आहे.

Click Here