चिप्सच्या पाकीटात का असते इतकी हवा?

चिप्स सगळ्यांनाच खूप आवडतात. पण, चिप्ससाठी जे आपण पैसे देताे, ते चिप्ससाठी असतात की हवेसाठी देताे? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना.

चिप्स कंपन्या नेहमी चिप्सची पाकीट एवढी माेठी तयार करतात. पण, त्यात अर्धी तर हवाच भरलेली असते. ही हवा साधी हवा नसते. 

चिप्स कंपन्या ग्राहकांची फसवणूक करतात, असे तुम्हाला वाटते का? पण, असं अजिबात नाहीये. 

चिप्स कंपन्या त्यांच्या ग्राहकांना चांगले चिप्स मिळावेत म्हणूनच हे करतात, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही ना? पण हे खरंय...

चिप्सच्या पाकीटात साधी हवा नसते. ती खास नायट्राेजन गॅसची हवा असते. यामुळे ग्राहकांचाच फायदा हाेताे. 

नायट्राेजन हवेमुळे चिप्स चांगले ताजे राहतात. नाहीतर नुसते चिप्स ठेवल्यास ते ओलसर हाेऊन खराब हाेऊ शकतात. 

जर या पाकीटात ऑक्सिजन असेल, तर चिप्स लवकर शिळे हाेतात. या चिप्सना बुरशी ही लागू शकते. 

ही हवा चिप्सचे संरक्षण कवच असते. या हवेमुळे चिप्स ट्रान्सपाेर्टमध्ये कमी तुटतात. 

चिप्सच्या या पॅकिंगला Modified Atmoshphere Packing म्हणतात. या पॅकिंगमुे कुरकुरीत चिप्स आपल्याला खायला मिळतात. 

Click Here