सर्वात स्वस्तात 5G स्मार्टफोन आला, भारतीय कंपनीने केला लाँच
5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर लावा बोल्ड N1 हा तुमच्यासाठी योग्य असू शकतो.
उद्या लावा बोल्ड N1 5G लाँच होणार आहे. हा मोबाईल स्वस्त असणार आहे.
त्याच्या 4 GB + 64GB व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे आणि 128 GB व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे.
ग्राहकांना SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर ७५० रुपयांची त्वरित सूट मिळणार असल्याने 64 Gb मॉडेलची किंमत फक्त ६,७४९ रुपये होते आहे.
फोनमध्ये ६.७५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे आणि अॅस्पेक्ट रेशो २०:९ आहे.
हा फोन Unisoc T765 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि अँड्रॉइड १५ वर चालतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.
या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. हा फोन पोर्ट्रेट, नाईट, प्रो आणि स्लो मोशन सारख्या मोडसह येतो आणि ४K/३०fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे जी १८W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. बॉक्समध्ये १०W चार्जरही येते.
हा फोन IP54 रेटिंगसह येतो. फोनमध्ये उपलब्ध कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ ४.२, OTG आणि USB टाइप-सी यांचा समावेश आहे.