चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला बाप्पाला नेमके काय अर्पण करावे?
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्ता, प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते.
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन कोट्यवधी घरांमध्ये केले जाते.
बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते.
संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो. प्राचीन काळापासून हे व्रत केले जाते.
संकष्ट चतुर्थीला बाप्पाच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास अपार लाभ मिळू शकतो, अशी मान्यता आहे.
बाकी काही करता आले नाही तरी ही एकच गोष्ट बाप्पाला आवर्जून अर्पण करावी.
दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. अन्य काहीच नसेल अन् केवळ एक दुर्वा अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे पुण्य मिळते.
तसेच गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. या दिवशी आवर्जून एक लाल फूल गणपतीला वाहावे.
गणेशाला मोदक प्रिय आहेत. अनेक घरांमध्ये मोदकचा नैवेद्य दाखवला जातो. मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवा.
गणपती बाप्पाला लाडू विशेष प्रिय आहेत. मोदक करणे शक्य नसल्यास लाडवाचा नैवेद्य गणेशाला दाखवावा, असे सांगितले जाते.
अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र २१ वेळा किंवा ११ वेळा म्हणावे. अथर्वशीर्ष पठण शक्य नसेल, तर 'ॐ सिद्धिविनायकाय नम:' या मंत्राचा जप यथाशक्ती करावा.
ॐ गं गणपतये नम:... गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...