चॅटजीपीटी दररोज २.५ अब्ज प्रश्नांची उत्तरे देते

चॅटजीपीटीचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

चॅटजीपीटीमध्ये आता दररोज २.५ अब्ज प्रॉम्प्टवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.

गेल्या आठ महिन्यांत, ChatGPT वरील प्रॉम्प्टची संख्या जवळजवळ अडीच पटीने वाढली आहे.

एकट्या अमेरिकेतून दररोज ३३ कोटींहून अधिक प्रॉम्प्ट येत आहेत.

भारतासह इतर देशांमध्ये चॅटजीपीटीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.

गुगल त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे १४ ते १६ अब्ज सर्च क्वेरीजवर प्रक्रिया करते.

चॅटजीपीटी अजूनही गुगलपेक्षा खूप मागे आहे, तरीही या प्लॅटफॉर्मने खूप कमी कालावधीत जलद वाढ दर्शविली आहे.

सध्या, गुगलच्या सर्च सेवेच्या तुलनेत एआय टूल्सचा बाजार हिस्सा फक्त १-२ टक्के आहे.

ChatGPT चा सर्वात वेगाने वाढणारा वापरकर्ता आधार शिक्षण, कोडिंग आणि कंटेट निर्मितीशी संबंधित आहे.

Click Here