चला ! स्वतःला करूया डी - स्ट्रेस 

रुटीन रुटीन रुटीन याला कंटाळला आहात? सगळ्याचा स्ट्रेस येतोय, टेन्शन घेऊ नका. स्वतःला डी - स्ट्रेस करा. 

स्ट्रेस वाढतोच आहे, वेळ मिळतच नाही, असच होतं असेल, तर आता स्वतःसाठी वेळ काढा. 

दिवसभर काम काम करता? आता रिलॅक्स होण्यासाठी चित्र काढा, रंगवा. चित्र शिकण्यासाठी क्लास लावा. डुडल करा. 

जेवण बनवा. नवीन डिश ट्राय करा. रोजच्या जेवणात नवीन एक्सपिरिमेन्ट करून बघा. 

घरात ठेवता येतील अशी झाडे लावा. फुलांची आवड असेल तर फुलं झाड लावा, रोज थोडा वेळ झाडांच्या मशागत करा. 

लिहिण्याची सवय करा. स्वतःचे विचार, प्लॅन्स लिहून ठेवा. यामुळे डोक्यातील गोंधळ कमी होउन स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल. 

कागदापासून, मातीपासून वस्तू बनवा. हस्तकलेच्या नवीन वस्तू तयार करा. नवीन गाेष्टी केल्याचा आनंद यातून मिळताे. 

काेणीही तुमच्याकडे बघत नाही, असा विचार करून तुम्हाला जमतं तसा डान्स करा. स्वतःच्या आनंदासाठी नाचा. 

दिवसातला काही वेळ काहीही न करता, डाेळे मिटून शांत बसून राहा. काेणाशी बाेलू नका, रिलॅक्स बसून रहा. 

राेज थाेडा तरी वेळ काढून पुस्तक वाचा. ई - बुक वाचू नका, पुस्तकाची हार्ड काॅपी वाचा, यातून एक वेगळा आनंद मिळताे.

Click Here