सर्वांनाच माहीत आहे की, माता लक्ष्मीला धनाची देवी अथवा धनलक्ष्मीही म्हटले जाते. जर माता लक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न असेल अथवा झाली, तर त्याची झोळी सुख आणि समृद्धीने भरली जाते.
माता लक्ष्मीसंदर्भात बोलताना, अशी कोणती घरे आहेत, जेथे माता लक्ष्मी आनंदाने नांदनते, यासंदर्भात आचार्य चाणक्य यांनी भाष्य केले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात मूर्ख व्यक्ती नसतात, अन्नाची कोठारं भरलेली असतात आणि पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही, अशा घरात माता लक्ष्मी सदैव नांदत असते.
आचार्य चाणक्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, ज्या घरात महिलांचा आदर केला जातो, जेथे भांडण होत नाही आणि शांतता असते, अशा घरात माता लक्ष्मी स्वतः येते.
म्हणूनच म्हटले जाते की, देश समृद्ध बनवायचा असेल, तर मूर्खांऐवजी, नेहमी ज्ञानी आणि सद्गुणी लोकांचा आदर करायला हवा.
आचार्य चाणक्य सांगतात, अन्न कधीही वाया घालवू नये, तर ते वाईट काळासाठी नेहमी साठवून ठेवायला हवे.
याशिवाय, घरात कधीही वादविवादाचे वातावरण निर्माण होऊ देऊ नये आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याला कधीही कमी समजू नये, असेही आचार्य चाणक्य म्हणतात.
जर विद्वानांचा आदर झाला, मोठ्या प्रमाणावर अन्न धान्य असेल, पती-पत्नीमध्ये सुसंवाद असेल, तर माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील संपत्ती सातत्याने वाढत राहील.