'चला हवा येऊ द्या' या टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शोचं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे.
या पर्वातून श्रेया बुगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यासाठी तिने खास लूक केला आहे.
याचे फोटो कॉमेडी क्वीन श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
काळ्या रंगाची साडी आणि डिझायनर ब्लाऊजमध्ये श्रेयाने फॅशन केली आहे.
केसांचं बन बांधून हेअरस्टाइल आणि मेकअपमध्ये श्रेयाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
श्रेयाचा हा नवा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.