यंदा २७ एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे, त्यादिवशी राशीनुसार केलेले दान लाभदायी ठरेल.
मेष : पाणी, ताक यांसारख्या उन्हाळ्यात तहान भागवणाऱ्या पदार्थांचे गरजूंना दान करावे.
वृषभ : पितृदोषातून मुक्तीसाठी यथाशक्ती धन आणि धान्याचे दान करावे.
मिथुन : उसाचा रस, थंड पाणी, ताक अशा उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या वस्तूंचे मोलमजुरांना दान करावे.
कर्क : खडीसाखर, दही, दूध, तूप अशा पांढऱ्या पदार्थांचे दान करावे.
सिंह : गूळ, चणे, मध अशा वस्तूंचे दान करणे लाभदायी ठरेल.
कन्या : शुद्ध तुपात बनवलेल्या एखाद्या पदार्थाचे दान करावे.
तूळ : गरजूंना भोजन तथा पांढऱ्या वस्तूंचे दान करणे हितकारक ठरेल.
वृश्चिक : गूळ, लाल कपडे, पैसे यापैकी यथाशक्ती वस्तूंचे गरजूंना दान करावे.
धनु : मिठाई तसेच पिवळ्या वस्त्राचे दान पितरांचे आशीर्वाद मिळण्यास लाभदायी ठरतील.
मकर : काळी उडीद डाळ, तीळ, गूळ या वस्तूंचे दान करावे.
कुंभ : पैसे किंवा चपलांचे गरजूंना दान करावे.
मीन : पिवळे पदार्थ किंवा शीतपेयाचे दान करणे लाभदायी ठरेल.