विरूष्का सूर्यास्तानंतर जेवत नाहीत!

आपण सेलिब्रेटींची स्टाईल फॉलो करतो, पण लाईफस्टाईल नाही; त्यांच्यासारखा काटेकोरपणा अंगी बाणला तर आपल्यालाही सेलिब्रेटी लूक मिळेल. 

उत्तम स्वास्थ्य असेल तर कोणत्याही प्रकारचे कपडे शोभून दिसतात, सौंदर्य आपोआप खुलते आणि ती व्यक्ती चारचौघात उठून दिसते. 

म्हणून सेलिब्रेटी फिटनेसवर जास्त भर देतात. चुकून कधी आवडीचा, हाय कॅलरीचा पदार्थ खाल्ला तर जिममध्ये घाम गाळून कॅलरीज बर्न करतात. 

सेलिब्रेटी होणं आणि ग्लॅमर टिकवणं सोपं नाही, फिटनेससाठी त्यांना आपला कम्फर्ट झोन सोडून बऱ्याचदा आवडी निवडीलाही मुरड घालावी लागते. 

यासाठीच ते सुनियोजित जीवनशैली अंगिकारतात. त्यातला मुख्य नियम म्हणजे ते सूर्यास्तानंतर जेवत नाहीत. 

रात्रीचे जेवण लवकर घेतल्याने पचन चांगले होते, झोप चांगली लागते, मन:स्वास्थ्य उत्तम राहते आणि वजन कमी होते; हा डाएट प्रकार नसून जीवनशैली आहे. 

अनुष्का आणि विराट संध्याकाळी ५.३० नंतर जेवत नाहीत...त्यामुळे ते दिवसभर एनर्जेटिक राहतात. 

५१ वर्षांची मलायका अरोरा संध्याकाळी ७ वाजता हलके जेवण घेते, ज्यामुळे ती या वयातही फिट आणि तुकतुकीत कांतीमुळे ग्लॅमरस दिसते. 

करीना सूर्यास्ताआधी जेवते आणि सूर्योदयापूर्वी उठून योगाभ्यास करते. ती तिच्या फिटनेस बाबतीत कायम चर्चेत असते. 

अक्षय कुमार ५६ वर्षांचा, तोही संध्याकाळी ७ नंतर काहीच खात नाही. दिवसभरातही घरचेच जेवण घेतो. आत्ताही तो तिशीतला तरुण दिसतो. 

मनोज वाजपेयी तर दुपारी ३ नंतर काहीच खात नाहीत. सकाळी नाश्ता, दुपारी ३ वाजता घरचे जेवण आणि नंतर पूर्णवेळ उपास!

ही आहारशैली २००० वर्षांपासून चालत आलेली आहे, मधल्या काळात आपणच ती विसरलो, निदान आता तरी सेलिब्रेटींना फॉलो करूया आणि फिट होऊया. 

Click Here