लग्नाच्या वाढदिवशी तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.
लग्नाच्या वाढदिवशी पार्टी करण्याऐवजी काही लोक आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करतात.
एखाद्या सुंदर ठिकाणी भेट दिल्याने मनाला शांती मिळते आणि एकमेकांसोबत दर्जेदार वेळही घालवता येतो.
पण, फिरायला जायचं म्हणजे पहिला प्रश्न की, कुठे जायचे? चला तर मग आपण त्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया...
जर तुम्हाला भारतातच फिरायला जायचे असेल, तर मसुरीला जाण्याचा प्लॅन करा. येथे तुम्हाला पर्वतांमध्ये जोडीदारासोबत फिरता येईल.
जर तुम्हाला शांत ठिकाणे आवडत असतील तर नैनितालला जा. नैनितालच्या पांगोट गावालाही भेट देऊ शकता.
औली हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. तुम्ही औलीमध्ये स्कीइंगचा आनंद देखील घेऊ शकता.
रानीखेत हे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. रानीखेत त्याच्या सुंदर दऱ्यांसाठी ओळखले जाते.
महाराष्ट्रातील लोणावळा हे देखील भेट देण्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे. जोडीने तुम्ही लोणावळा फिरू शकता.
जर, तुम्हाला जंगल सफारी आणि साहस आवडत असेल, तर जिम कॉर्बेटला नक्की जा.
खास सेलिब्रेशनसाठी बाहेर जाण्यापूर्वी, हॉटेल भाडे आणि भेट देण्यासारख्या ठिकाणांबद्दल चांगले जाणून घ्या.