सरोगसी करुन आई-वडील झालेले बॉलिवूडचे कपल्स... 

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल्सनी सरोगसीचा स्वीकार केला आणि आई-वडील होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

सरोगसीद्वारे पालकत्वाचा आनंद अनुभवलेले बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्स कोणते आहेत... 

 बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांनी २०१३ मध्ये सरोगसीद्वारे त्यांचा तिसरा मुलगा 'अबराम' याला जन्म दिला. 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक यांनी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे मुलगी 'मालती मेरी' हिच्या जन्माची गोड बातमी दिली.

अभिनेत्री प्रिती झिंटा २०२१ मध्ये सरोगसीद्वारे जय आणि जिया या जुळ्या मुलांची आई झाली.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २०२० मध्ये सरोगसीद्वारे मुलगी 'समीशा' चे स्वागत केले.

फक्त कपल्सच नाही, तर करण जोहरनेही सरोगसीद्वारे यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता होऊन 'सिंगल पॅरेंटिंग'चा आदर्श ठेवला.

टीव्ही क्वीन एकता कपूर २०१९ मध्ये सरोगसीद्वारे मुलगा 'रवि कपूर' ची आई झाली.

२०१६ साली तुषार कपूरने सरोगसीद्वारे लक्ष्य कपूर याची सिंगल फादर म्हणून जबाबदारी स्वीकारली. 

Click Here

Your Page!