उन्हात गेल्यावर लगेच डोकं दुखतं? हे आहे त्यामागचं कारण

उन्हात गेल्यानंतरच डोकं का दुखतं याचा कधी विचार केलाय का?

बऱ्याचदा उन्हात गेल्यानंतर अचानकपणे डोकं दुखायला लागतं. काही वेळा आपण या गोष्टीकडे दुर्लक्षही करतो. मात्र, उन्हात गेल्यानंतरच डोकं का दुखतं याचा कधी विचार केलाय का?

उन्हात गेल्यावर डोकं दुखणं ही सामान्य बाब असली तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कारण, जर वारंवार तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुमच्या आहारविहारात कमतरता आहे हे समजून जा.

उन्हात गेल्यानंतर आपल्या शरीराचं तापमानदेखील वाढतं. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं. परिणामी, मेंदूतील पेशी आकसल्या जातात.आणि, डोकं दुखू लागतं.

जर वारंवार तुमचं डोकं दुखत असेल तर शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, उन्हात गेल्यावर थोड्या थोड्या अंतराने पाणी पित रहा.

उन्हात जातांना कायम टोपी किंवा स्कार्फचा वापर करा. ज्यामुळे डोक्याला थेट उन्हाची झळ बसणार नाही.

25 ते 45 वयोगटातील स्त्रियांनी करा 'या' हेल्थ टेस्ट

Click Here