कॅस्पियन समुद्र गायब होण्याची भीती, काय आहे कारण?

हवामान बदलाचा जगभरातील अनेक ठिकाणी परिणाम होत आहे. 

कॅस्पियन समुद्र हा जगातील सर्वात मोठे खारट तलाव असून, गेल्या पाच वर्षांत त्याचा पाणीपातळी सुमारे 0.93 मीटर (3 फूट) ने खाली गेली आहे. ही पातळी दरवर्षी 20-30 सेंटीमीटरने कमी होत आहे.

हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, त्यामुळे सागरातील पाण्याचा प्रवाह कमी होतो आहे. वोल्गा नदीवर धरण बांधल्यामुळे पाण्याचा पुरवठा आणखी घटला आहे.

रशियन शास्त्रज्ञांच्या मते पाणी पातळी कमी-जास्त होणे नैसर्गिक चक्र असू शकते, पण कझाकिस्तानच्या पर्यावरण तज्ञांच्या मते हवामान बदल व नद्यांचा अतिवापर हा मुख्य कारण आहे.

या घटलेल्या पाणीपातळीमुळे अजरबैजानसारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो आहे. बाकू पोर्टमध्ये जहाजांची ये-जा कमी होत आहे.

पर्यावरणीय परिणाम म्हणून स्टर्जन माशांच्या 45% तसेच कैस्पियन सीलच्या बहुतेक प्रजनन स्थळांचे नुकसान झाले आहे. सागराची पातळी आणखी 5 मीटर खाली गेल्यास सीलच्या 81% स्थलांचे नुकसान होईल.

किनारी आर्द्रभूमी, लॅगून आणि रीड बेड्स नष्ट होत आहेत, त्यामुळे स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

कैस्पियन सागराच्या काठावर सुमारे 1.5 कोटी लोक राहतात, त्यातील 40 लाख अजरबैजानमध्ये आहेत. जलपातळी कमी झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झालेला आहे.

अजरबैजान व रशियाने समस्या सोडवण्यासाठी कार्यगट स्थापन केला असून, सागराच्या स्थितीवर ऑनलाईन देखरेखीची योजना आखली आहे. 

तज्ञांचे मत आहे की 21व्या शतकाच्या अखेरीस कैस्पियन सागराची पातळी 9 ते 18 मीटरपर्यंत खाली जाऊ शकते, ज्यामुळे परिसरात आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक संकट आणखी गंभीर होईल.

Click Here