कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ला सुरुवात झाली आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ला सुरुवात झाली आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटीही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत.
अभिनेत्री मौनी रॉयनेदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.
मौनीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ग्लॅमरस लूक करत तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मात्र मौनीच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. कारण, काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्जरीमुळे अभिनेत्रीचा चेहरा बदलला आहे.
त्यामुळे मौनी आता पहिल्यासारखी दिसत नाही. तिला एका क्षणात ओळखणं कठीण जात आहे.
मौनीचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.