Cannes: जान्हवीच्या लूकवर खिळल्या नजरा!



फिल्मी दुनियेतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची जगभरात चर्चा आहे.




अलिकडेच हा फेस्टिव्हल सुरु झाला आहे. हा ७८ वा कान्स फिल्म फेस्टिव्हल २४ मे पर्यंत चालणार आहे.



यंदा कान्समध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पहिल्यांदा हजेरी लावली आहे.



जान्हवीने यावेळी हटके अंदाजात कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. 



त्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.




या फेस्टिव्हलमध्ये जान्हवीने डिझायनर ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती एकदम सुंदर दिसत होती. तिच्या या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं.



दरम्यान, या फेस्टिव्हलमध्ये जान्हवीसोबत अभिनेता ईशान खट्टर, निर्माता करण जोहर यांचीही उपस्थिती होती.

Click Here