तुम्ही देखील रोज शॅम्पूने केस धुताय? तर वेळीच थांबा
आपल्या प्रत्येकाची स्कॅल्प ही वेगळी असते, त्यामुळे केसांसाठी वेगळा शॅम्पू वापरायला हवा.
तेलकट स्कॅल्प असणाऱ्यांनी आठवड्यातून ३ वेळा शॅम्पूने केस धुवायला हवे.
जर आपले केस अधिक कोरडे असतील तर आठवड्यातून १ ते २ वेळा शॅम्पूने केस धुवा.
दररोज केसांना शॅम्पूने धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते.
आपण सौम्य आणि सल्फेट फ्री शॅम्पू वापरायला हवा. ज्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होईल.
व्यायाम केल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर शॅम्पू करणे गरजेचे असते.
योग्य प्रमाणात आणि पद्धतीने वापरल्यास केसांसाठी शॅम्पू फायदेशीर असतो.