तुम्ही सुद्धा बेबी प्रोडक्ट वापरता का? बाळासाठी सेफ पण तुमच्यासाठी आहेत ते घातक

काही स्त्रिया बाळासारखी सॉफ्ट त्वचा मिळावी यासाठी बेबी प्रोडक्ट वापरतात.

अनेकदा काही स्त्रिया बाळासारखी सॉफ्ट त्वचा मिळावी यासाठी बेबी प्रोडक्ट वापरतात. परंतु, हे प्रोडक्ट बाळासाठी कितीही सेफ असले तरीदेखील मोठ्यांच्या त्वचेसाठी घातक आहेत.

प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट जुशिया सरीन यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करुन बेबी प्रोडक्ट मोठ्या व्यक्तींनी वापरल्यास त्याचे काय तोटे होऊ शकतात हे सांगितलं आहे.

 बाळाच्या त्वचेमध्ये घामचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे बाळांसाठीचं क्लिंजर हे त्यांच्यासाठी सेफ असतं. मोठ्यांमध्ये हेच प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपण ते वापरलं तर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

बाळाचा शॅम्पू हा अत्यंत सौम्य असतो. त्यामुळे आपण जर तो वापरला तर त्याने आपला स्कॅल्प व्यवस्थित स्वच्छ होत नाही. परिणामी, केसात कोंडा होणं, इन्फेक्शन यांसारख्या समस्या उद्भवतात.

बाळाच्या मॉश्चराईजरमध्ये तेल आणि ऑक्लुसिव्ह एजेंट्सचं प्रमाण जास्त असतं. अशातच जर ते आपण वापरलं तर आपले पोर्स बंद होऊ शकतात. तसंच स्कीन तेलकटदेखील होते.

चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे  'हे' 5 व्हिटामिन्स आहेत कारणीभूत

Click Here