भायखळ्यातील राणीच्या बागेचं खरं नाव ९९ % लोकांना माहित नसेेल
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची जागा म्हणजे राणीची बाग.
मुंबईकर सुट्टीच्या दिवशी राणीच्या बागेत हमखास जाण्याचा प्लान आखतात. राणीची बाग म्हणून ओळख असलेल्या या जागेचं खरं नाव अनेक लोकांना माहित नसेल
राणीच्या बागेची निर्मिती १८६१ साली करण्यात आली. पुढे १८६२ साली ही बाग जनतेसाठी खुली करण्यात आली.
तेव्हाच्या भारताच्या राणी व्हिक्टोरीया यांच्या नावावरुन या बागेला 'व्हिक्टोरीया गार्डन' असं नाव देण्यात आलं. पुढे हेच गार्डन 'राणीची बाग' म्हणून प्रसिद्ध झालं
राणीची बागेचं नामकरण कालांतराने वीर जीजामाता भोसले उद्यान असं करण्यात आलं.
आजही सर्वांसाठी राणीच्या बागेचं खास स्थान आहे. राणीबाग ही प्रत्येकासाठी जवळची आहे