फुलपाखरांचे पाय असते त्यांची जीभ!

रंगीबेरंगी, नाजूक फुलपाखरं सगळ्यांपेक्षा वेगळी असतात. त्याचप्रमाणे त्यांची शरीररचना पण वेगळी असते. 

फुलपाखरांना अन्य प्राण्यांसारखी जीभ नसते. मग, त्यांना जीभ नसते, तर ते चव कशी घेतात? हे तुम्हाला माहिती आहे का? 

पदार्थांची चव ओळखण्यासाठी त्यांच्याकडे विशेष इंद्रिय असते. त्यांच्या पायात चव ओळखण्याची क्षमता असते. 

फुलपाखरू जेव्हा फुलावर बसते, तेव्हा त्याच्या पायातून त्याला कळते की, फुलामध्ये किती मध आहे, गाेडवा किती आहे. 

पायांमध्ये ही क्षमता असल्यामुळे त्याला काेणत्या फुलात मध आहे, हे पटकन कळते, याचा त्याला खूप फायदा हाेताे. 

फुलपाखरू अन्नासाठीच नाही, तर अंडी घालण्यासाठी काेणतं झाडं याेग्य आहे हे देखील त्यांना पायातून कळते. 

फुलपाखरांचे पाय म्हणजे त्यांची जीभ असते. याचा त्यांना अनेक ठिकाणी उपयाेग हाेताे. त्यांना मिळालेली एक देणगी आहे. 

पायांची संवेदना चांगली असल्याने फुलपाखर सतत फुलांवर बागडताना दिसतात. त्यामुळे पुढच्या वेळी फुलपाखरांचे निरीक्षण करा. 

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here