कंबरेभोवतीची चरबी कमी करायची असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करणे गरजेचे आहेत.
वजन वाढलं की सहाजिकच शरीरातील चरबीचंही प्रमाण आपोआप वाढू लागतं. यात खासकरुन पोट आणि कंबर या भागात चरबीचं प्रमाण जास्त वाढतं.
पोट आणि कंबर या भागातील चरबी कमी करायची असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात आणि आहारात काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहेत.
कंबरेभोवतीची चरबी कमी करायची असेल तर गोड पदार्थ, सोडा, मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करा. या पदार्थांमुळे पोट आणि कंबरेची चरबी झपाट्याने वाढते.
आहारात डाळी, कडधान्ये, अंडी किंवा पनीर यांचा समावेश करा. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. ज्यामुळे लागणारी अतिरिक्त भूक मर्यादित राहते.
पालेभाज्या, फळे आणि ओट्स यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोटाचा घेर कमी होतो.
रात्री झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवा. तसंच जेवणात हलका आहार घ्या.
मांड्या आणि हिप्सजवळील चरबी कमी करायची असेल तर स्क्वॉट्सचे दररोज १५ ते २० असं ३ सेट करा.
Plank केल्यानेही पोट आणि कंबर येथील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.